Monday, 18 August 2014

जलशृंखला योग

'जलशृंखला योग'

या योगावर जन्मलेल्या माणसाला सदैव एका चमत्कारीक परीस्थितीशी झुंजावं लागतं.
उदाहरणार्थ- शौचकुपातल्या टाकीला पाणी नसणे.
साखळी ओढल्यावर आवाजाखेरीज बाहेर काहीही न येणे.

अशा वेळेस तक्रारी करुन करुन घर मालक काय दाद देत नाही. आणि अनपेक्षीतपणे एखाद्या दिवशी तो घर मालकाचा माणुस येतो. घर मालकाचा हा माणुस 'माणुस' याच नावाने ओळखला जातो. घर मालकाला काहीही तक्रार केली की - ' आमच्या माणसाला सांगा '. असे म्हणुन तो वाट्याला लावतो.
मालक तर तक्रारी ऐकायच्या मनस्थीतीत आणि देहस्थीतीत कधीच नसतो.

'माणुस' मंडळींचा चेहरा हा सदैव रात्रीची जरा जास्त झाल्यासारखाच असतो कारण ती तशी झालेलीच असते,नियमच आहे तो. 'माणुस' लोक स्वच्छता आणि संभावीतपणा यापासुन कटाक्षाने अलिप्त राहतात.

मग त्याचा आणि जलशृंखला योगावरच्या भाडेकरुचा संवाद सुरु होतो.

माणुस विचारतो त्याला- " काय कंप्लेंट हाय "

"अहो कंप्लेंट कसली हे साखळी ओढली तरी पाणी येत नाही, सहा महीने झाले. भाडी मात्र टीचुन घेतात-"

"हे बघा ते भाड्या बिड्याच मला नका सांगु, ते मालकाला सांगा. ही असली खेटकी टाकायची आपल्याला सवय नाहीये, काय...बघु तुमची साखळी."

म्हणुन मग तो पापग्रह त्या गृहात जातो.ती साखळी ओढतो आणि सहा महीने खडखडाट करत पडलेल्या टाकीतुन ढासकन पाणि येतं. भागीरथाने गंगा आणावी तसं.

"साली टेनन लोकांना सवयच हाये खाली पिली कंप्लेंट करायची"

हे त्याचं वाक्य आपण कानावर घ्यायचं नसतं. एकदाचं टाकीला पाणि यायलच लागलं या आनंदात आपण झोपतो. दुसऱ्‍या दिवशी सकाळी आपण साखळी ओढल्यावर पुन्हा खडखडाट.

हा जलशृंखला योग.

पुढचा योग आहे "बुट्टी अधिकारी योग"

क्रमश:
Photo: 'जलशृंखला योग'

Share This Article Facebook +Google Twitter Digg Reddit